GFGCOE

Latest Announcements:

Latest Announcements:

Avishkar 2025 Zonal Level Research Competition Sparks Innovation at GF's  Godavari College of Engineering Jalgaon   |   Organizes Orientation on NEP 2020.. Inauguration of " Pravartan 2024" Induction Program   |   Organizes Orientation on NEP 2020..   |   Inaugurates Faculty Development Program on “Machine Learning & Data Analytics using Python Programming”

Menu

Blog

Latest news from our company

Never stop learning.

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट संदर्भात मार्गदर्शन

महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याचे अंतिम ध्येय हेच असते की, चांगल्या प्रकारच्या कंपनीमध्ये उच्च पदस्थ नोकरी लागावी किंवा सरकारी व निम सरकारी कंपन्यांमध्ये काम मिळावे.

या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांना नोकरी करता, व्यवसायाकरिता व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रशिक्षित करण्यात यावे हा उदात्त हेतू मनात बाळगून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट विभागामार्फत दिनांक 26 मे 2023 रोजी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्राध्यापक रम्या कन्नन मॅडम (कम्युनिकेशन स्किल एक्सपर्ट), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा.हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा.महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख) तसेच विभागनिहाय ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कॉर्डिनेटर, सर्व प्राध्यापक वर्ग व द्वितीय आणि तृतीय वर्षाचे सर्व विभागाचे विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभाग निहाय प्रेझेंटेशन ठेवण्यात आले होते. त्या प्रेझेंटेशन मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विभाग कोण कोणते प्रयत्न करते या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिक्रुटमेंट प्रोसेस कशा पद्धतीने असतात व विद्यार्थ्यांनी त्या कंपन्यांना रजिस्ट्रेशन करताना कोणकोणत्या स्टेप्सवर बारकाईने काम केले पाहिजे यावर मार्गदर्शन दिले.

सर्वप्रथम प्रा.भावना झांबरे (संगणक विभाग) यांनी विद्यार्थ्यांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह संदर्भात माहिती दिली.

त्यानंतर प्रा.हेमंत नेहेते (यंत्र विभाग) यांनी Eleation या कंपनीची रिक्रुटमेंट प्रोसेस विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. व यंत्र विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम सांगितले.
त्यानंतर प्रा. अमित म्हसकर (विद्युत विभाग) यांनी एल अँड टी या कंपनीची रिक्रुटमेंट प्रोसेस समजावून सांगताना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेचा स्कोप विद्यार्थ्यांना सांगितला.

त्यानंतर प्रा.महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्युत शाखेमध्ये यशस्वी होण्यासाठी व प्लेसमेंट मिळवण्यासाठी कोण कोणते गुण आत्मसात करावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्युत शाखेतील रिसेंड ट्रेंड्स वर मार्गदर्शन केले.

त्यानंतर प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख) यांनी सध्या परिस्थितीमध्ये संगणक क्षेत्रात नाविन्यपूर्ण गोष्टींचा भरणा आहे व त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्यांचे त्यांचे पाऊल उचलून या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. तसेच वेगवेगळ्या ऑनलाईन सर्टिफिकेशन बद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर प्रा.तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख) यांनी प्लेसमेंट संदर्भात बोलताना एम्प्लॉयबिलिटी या बद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच काही अष्टपैलू गुण आत्मसात केल्यानंतर आपण एक परफेक्ट कॅंडिडेट होऊ शकतो ज्याची गरज आज इंडस्ट्रीमध्ये आहे.

त्यानंतर प्रा.रम्या कानन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले. या सेशनमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांना बोलते केले. प्लेसमेंट इंटरव्ह्यूला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे स्वतःचे सादरीकरण करायला हवे याबद्दल त्यांनी टिप्स दिल्या.

त्यानंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.हेमंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय वेगवेगळ्या योजना राबवत असते, त्या सर्व योजनांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेणे गरजेचे आहे असे नमूद केले.

त्यानंतर महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उणीवांवर कसे काम करायला पाहिजे. व प्रत्येक गोष्टीची निकड आपल्याला भासणे गरजेचे आहे. यासंदर्भात उत्कृष्ट उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिले. अतिशय समर्पक शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सदर कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारचे कार्यक्रम हे तुमच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी महाविद्यालय नेहमीच आयोजित करत राहील असे नमूद केले. प्लेसमेंट संदर्भात बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा जाहीर केली की अंतिम वर्षात असतानाच प्रत्येकाने चांगल्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये रुजू व्हावे व त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावे.

सदर कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित म्हसकर (विद्युत विभाग) व आभार प्रदर्शन प्रा. हेमंत नेहेते (यंत्र विभाग) यांनी केले.

विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Industrial Visit of Computer Department at Soft Aid

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथील संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथील संगणक विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी Softaid Computer जळगाव येथे अभ्यास सहल दिनांक 24 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली.

या व्हिजीट मध्ये विद्यार्थ्यांना कॉम्पुटर सॉफ्टवेअर या विषया मध्ये सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन लागतात, ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीने बनवितात तसेच या सॉफ्टवेअर ची कोडींग करताना येणारे एरर कसे हॅन्डल करतात. याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर ची टेस्टिंग कश्या प्रकारे करतात या विषया बद्दल सखोल मागदर्शन softaid computer चे श्री.ललित महाजन सर यांनी केले.

या नंतर कॉम्पुटर सर्व्हर बद्दल माहिती देताना त्यावर कसे काम करायचे व त्यामध्ये डेटा कसा सेव्ह करायचा याचे मार्गदर्शन केले, सर्व्हर ला कश्या प्रकारे सुरक्षितता प्रदान केली जाते, या विषयी मागदर्शन केले. या इंडस्ट्रियल व्हिजीटमध्ये 72 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांना या अभ्यास सहलीच्या माध्यमातून कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तसेच कॉम्प्युटर्स सर्वर या संबंधित सखोल मार्गदर्शन मिळाले.

विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले त्या माध्यमातून त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळाली.

विद्यार्थ्यांचा या सहलीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इंडस्ट्रियल व्हिजीट साठी संगणक विभागाचे प्रो. योगेश फेंगडे, प्रो.जयश्री पाटील, प्रो. भावना झांबरे यांनी सहकार्य केले.

MOU with Softaid Computers

Today Godavari Foundation’s Godavari College of Engineering Jalgaon and Softaid Computers Jalgaon signed MOU. It will facilitate Live Projects, Industrial Visit, Technical Expert Lecture, Mentorship, Internship and Placement. Ms Ameesha Sirsate, Ms Sheetal Khadse, Dr Vijaykumar Patil Principal, Dr Vijaykumar Wankhede Training and Placement Officer, Prof HT Ingale Dean Academics & HOD E&TC, Prof Tushar Koli HOD Mechanical, Prof Nilesh Wani HOD Computer, Prof MH Patil HOD Electrical and Prof Deepak Zambare Principal Polytechnic were present.