गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगांव तर्फे भव्य जनजागृती रॅली….
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगाव यांचे तर्फे दि. 12 मार्च 2024 रोजी विकसित भारत अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्त भारत व पर्यावरण याविषयी जनजागृती करणेसाठी भव्य पथसंचलनाचे आयोजन केले होते. या निमित्ताने महाविद्यालयातील तंत्रनिकेतनचे सर्व विद्यार्थी या पथसंचालनात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत अभियान 2047 व येत्या सन 2047 मध्ये विकसित भारत कसा असावा व 2047 चा विकसित भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत व त्यांचे प्रयत्न कसे महत्त्वाचे आहेत याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. तदनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून पथसंचलनाची सुरुवात केली. पथसंचलनातील विविध घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणांच्या व घोष फलकांच्या माध्यमातून विविध स्तरावर जनजागृती केली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. अतुल बऱ्हाटे, सर्व विभाग प्रमुख त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.