गोदावरी अभियांत्रीकीत विभागीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ
जळगाव-| दिनांक :- 07-11-2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अर्थात ‘बाटू’ अंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या विभागीय क्रीडा स्पर्धा आजपासून गोदावरी अभियांत्रीकीत सुरू झाल्या आहेत. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी गोदावरी फाउंडेशन जळगाव चे अध्यक्ष मा. खासदार डॉक्टर उल्हास पाटील सदस्य डॉक्टर केतकीताई पाटील तसेच हृदयरोग तज्ञ डॉक्टर वैभव पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिलेत. याच्या उदघाटनानंतर कबड्डीचे सामने रंगले आहेत.



