गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात साजरा
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ७६व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते तिरंगा फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गितांवर नृत्य सादर करत भारत मातेला वंदन केल्याचे पहावयास मिळाले.
गोदावरी सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांना उत्स्फुर्त दाद मिळाली . यानंतर देशभक्तीपर गितांचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. एन.एस. आर्वीकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच पाटील यांच्यासह आदि उपस्थित होते.


