GFGCOEBlogNewsUncategorized*गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात युवक दिन साजरा*भारत राष्ट्र आपली संस्कृती व समाजाच्या उत्कर्षासाठी युवकांनी जागे व्हावे व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नये असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांची आज 12 जानेवारी रोजी जयंती.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.नितीन भोळे (प्रमुख बेसिक सायन्सेस अँड हुमानिटीज),प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता),प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख) तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेला सुरुवात झाली.वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी नारायण खडके, वैभव अहिर, श्वेता बोरसे, कुणाल बागुल, प्रथमेश पवार यांनी सहभाग नोंदविला. अतिशय समर्पकपणे उदाहरणांचे स्पष्टीकरण देऊन या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्याची माहिती विशद केली. त्यांच्या मनोगतामध्ये विवेकानंद यांनी युवकांसाठी दिलेला संदेश व त्या संदेशानुसार आपण मार्गक्रमण करायला हवे हे सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्वराज्य मधील असलेली भूमिका याबद्दल माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर व कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, युवकांनी महापुरुषांचा कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातून शक्य आहे. घडविण्याची सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडण व स्वराज्य निर्मितीचा पाया यामध्ये जिजाऊ मातेचे असलेले योगदान विशद केले.मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. नकुल गाडगे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्षाचे विद्यार्थी अक्षता भोळे व चेतन बाविस्कर यांनी केले.
*गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात युवक दिन साजरा*भारत राष्ट्र आपली संस्कृती व समाजाच्या उत्कर्षासाठी युवकांनी जागे व्हावे व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नये असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांची आज 12 जानेवारी रोजी जयंती.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.नितीन भोळे (प्रमुख बेसिक सायन्सेस अँड हुमानिटीज),प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता),प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख) तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेला सुरुवात झाली.वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी नारायण खडके, वैभव अहिर, श्वेता बोरसे, कुणाल बागुल, प्रथमेश पवार यांनी सहभाग नोंदविला. अतिशय समर्पकपणे उदाहरणांचे स्पष्टीकरण देऊन या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्याची माहिती विशद केली. त्यांच्या मनोगतामध्ये विवेकानंद यांनी युवकांसाठी दिलेला संदेश व त्या संदेशानुसार आपण मार्गक्रमण करायला हवे हे सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्वराज्य मधील असलेली भूमिका याबद्दल माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर व कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, युवकांनी महापुरुषांचा कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातून शक्य आहे. घडविण्याची सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडण व स्वराज्य निर्मितीचा पाया यामध्ये जिजाऊ मातेचे असलेले योगदान विशद केले.मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. नकुल गाडगे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्षाचे विद्यार्थी अक्षता भोळे व चेतन बाविस्कर यांनी केले.