गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात लिनेश सिंग यांचे स्टार्ट अप इंडियावर मार्गदर्शन
उद्योजकता हा एकाकी प्रवास आहे. त्यामध्ये आपल्याला अपयशाला न घाबरता वेगवेगळ्या प्रात्याक्षिकावर काम करणे गरजेचे असते. काही वेळेस इनोव्हेशनमध्ये अपयश येणे हेही फायदेशीर असते कारण अपयशानंतर व्यक्ती अधिक जागरुक होवून अचूक बनतो आणि नवनविन संधीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात. त्याकरीता गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इनोव्हेशन व स्टार्ट अप वर मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी इन्स्टीट्यूशन इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनारसाठी प्रमुख वक्ते म्हणून १०००० स्टार्टअप इंडियाचे को-फांऊडर अॅड सीईओ लिनेश सिंग हे उपस्थीत होते. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील, महाविद्यालयाचे अॅकेडमीक डिन प्रा.हेमंत इंगळे हे उपस्थीत होते. प्रास्ताविकात डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप संदर्भात विस्तृत माहिती देताना, त्याचे महत्व समजावून सांगितले. उच्चशिक्षणासंबंधित तसेच उद्योगजगतेबाबत सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यासंबंधित असलेल्या निधींबद्दलही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्टार्टअप साठी नेहमी तयार असावे व त्यासाठी प्रयत्नशीलही असावे, असे आवाहनही डॉ.पाटील यांनी केले.